सुनिता विल्यम्स यांना भारत भेटीचे निमंत्रण   

पंतप्रधान मोदी यांनी पाठवले पत्र

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आणि नासाच्या अवकाशवीर सुनिता विल्यम्स यांना भारत भेटीचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले आहे. या संदर्भातील एक पत्र त्यांनी नासाला लिहिले आहे. आंतररराष्ट्रीय अवकाश स्थानातून सुनिला विल्यम्स आणि त्यांचे सहकारी आज (बुधवारी) पृथ्वीवर परत येणार आहेत. बोइंंगच्या कुपीत बिघाड झाल्यामुळे त्या सुमारे ९ महिन्यांपासून अंतरराळ स्थानकात अडकल्या होत्या. त्यांच्या परतीच्या प्रवासास मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी १ मार्च रोजी लिहिले होते. ते नासाचे माजी अवकाशवीर माईक मॅस्सीमनो यांच्या मार्फत पाठवले होते. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवर पोस्ट केले आहे. पत्रात मोदी यांनी लिहिले की, तुम्ही पृथ्वीपासून हजारो मैल दूर असला तरी आमच्या हृदयाजवळ आहात. भारतीय नागरिक तुम्हाला चांगले आरोग्य आणि मोहिमेत यश लाभो, अशी प्रार्थना करत आहेत. तुम्ही पृथ्वीवर परतल्यानंतर भारत भेटीवर या. भारताच्या कन्या असल्यामुळे आम्ही तुमच्या स्वागतासाठी  आणि पााहुणचार करण्यासाठी तत्पर आहोत. सुनिता यांचे वडील दीपक पांड्या यांची २०१६ मध्ये अमेरिकेच्या दौर्‍यावेळी भेट झाल्याचा उल्लेखही पत्रात मोदी यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात मेस्सिमिनो यांच्यासोबतच्या चर्चेत तुमचे नाव आले होते. तेव्हा तुमच्या कार्यावर सखोल चर्चा देखील झाली होती. त्यानंतर मला तुम्हाला पत्र लिहावेसे वाटले होते. अमेरिकेच्या दौर्‍यात देखील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ज्यो बायडेन यांच्याशी मी तुमच्या प्रकृतीविषयी विचारले होते. १४४ कोटी भारतीय तुमच्या कार्याने भारावले आहेत. अंतरराळ स्थानकातील घटना पाहता तुमच्या धैर्याचे ते कौतुक करतात. तसेच त्यांना तुमच्यापासून विपरीत परिस्थितीत लढा देण्याची प्रेरणा घेतात. मोदी यांनी पुढे लिहिले आहे की, तुमची आई  बोनी पांड्या तुमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. दीपकभाई यांचे आशीर्वाद तुमच्या पाठिशी आहेत. मोदी यांनी सुनिता विल्यम्स यांचे पती मायकेल यांना देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

Related Articles